ठाकरे यांचे राजकारणच सौदेबाजीवर; मुख्यमंत्री असतानाचे समर्थनाच्या पत्राची किंमत १०० कोटी

आमदार नितेश राणे यांचा घनघात

बाळासाहेबांचं बेळगावसाठी आंदोलन केले तेव्हा संजय राउत कुठे होते ?

पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न राऊत यांचा सुरू आहे

संतोष राऊळ | कणकवली : खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचेही ब्लॅकमेलिंग चे धंदे आहेत. बार्शी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला समर्थनासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जे पत्र दिलं त्याची किंमत शंभर कोटी होती. आता विरोधासाठी किती ? अडीचशे कोटी की ५०० कोटी ते जाहीर करा. प्रकल्प आला की विरोध करण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी यांचे रेट कार्ड आहे. उद्धव ठाकरे चे भाषण किंवा आदित्य ठाकरे समर्थन,नेते आणि पाच हजार सैनिक किंवा विरोधासाठी दहा हजार शिवसैनिक हवे तर दर पत्रकच केलेले आहे. त्याप्रमाणे हे डील करतात.हे मला एका चागल्या उद्योजकाने सांगितले. यांचे राजकारणच सौदेबाजीवर चालते असा घनागती आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

प्रहार भवन येथे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेना आणि खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले,ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काल बेळगावात गेले होते. कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिथे त्यांनी सभा घेतली. या सगळ्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. “संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर आहे. मोठया तावा-तावाने बोलतोय. मराठी बांधवांसाठी प्रचाराला गेलाय म्हणतोय. मी पुन्हा पुन्हा सांगतो की, हिंमत असेल तर पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल बोल.तुला मराठी माणसांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही”, असं नितेश राणे म्हणाले आहेत संजय राऊतने आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आग लावली आणि आज सामनात आग्रलेख लिहून पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न केलाय.आज अग्रलेखातून परत सिद्ध झालय राऊत आग लावण्याचे काम करतोय, असंही आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.

संजय राऊत या शकुनी मामाला विचारायचं आहे. जुन्या गोष्टी विसरला असशील तर थोडं मुद्दामहून आठवण करून द्यायच्या आहेत. याच म्हणणं बेळगाव आंदोलनाशी भाजपचा काही संबंध नाही. संजय राजाराम राऊतने एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं…. बाळासाहेबांचं बेळगावसाठी आंदोलन सुरू होत तेव्हा तू कुठे होतास ? सामनात होतास की लोकप्रभात ?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.सरडा जसा रंग बदलतो तसा हा कारटा आहे. तेव्हा हा समाजवादी विचारसरणीचा होता.हिंदू विरोधात तेव्हा याने अनेक आर्टिकल लिहिली आहेत. तू लिहिले आर्टिकल एकदा वाचून दाखवणार आहे. मग तुला लोक चपलांनी मारतील, असा घणाघात नितेश राणे यांनी राऊतांवर केला आहे.

संजय राऊत प्रचाराला यायचा नसेल तर आमच्या उमेदवाराला ऑफर दिली गेली. आमच्या उमेदवाराने तिने ऑफर फेटाळली. जर ती ऑफर स्वीकारली असती तर हा आज बेळगावला गेला नसता. जसा मालक तसा कामगार, जसा कामगार तसा मालक. उद्धव ठाकरे याहून वेगळे नाहीत. संजय राऊत एक संपादक आहे. तो मग एवढ्या गाड्या कुठून येतात? त्याच्या घरात लागलेल्या गाड्या बघा. एवढ्या महागड्या गाड्या वापरणारा दुसरा कुठला संपादक आहे. याचा ब्लॅकमेल हाच धंदा आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.भाजपा आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नितेश राणे म्हणाले की, ताई आणि अजित दादांमध्ये आग लावण्याचे काम आजच्या सामना मधील अग्रलेखामधून करण्यात आले आहे. पवार साहेबांना, सुप्रिया ताईंना मी विनंती करतो आहे. अजित दादांना तर राऊत याचा रंग माहित आहे. ह्याला घरी घेऊ नका. हा घरी घेण्याच्या लायकीचा माणूस नाही. असे आमदार नितेश राणे म्हणाले. यासोबतच ते म्हणाले की, याचा एक डोळा पवार कुटुंबावर आहे तर एक डोळा तेजस, आदित्य ठाकरेंवर आहे. म्हणून आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून परत एकदा हे सिद्ध झालेय. हा कारटा फक्त आग लावण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात शकुनी मामा बनून फिरतो आहे. राऊतांचे आधीचे लोकप्रभा मधील लेख वाचलेत तर लोक चपलाने मारतील असे आमदार नितेश राणे म्हणाले.