आरोग्य मंदिर येथे रिक्षेला दुचाकीची धडक; प्रवासी जखमी 

 

 

रत्नागिरी । प्रतिनिधी :शहरातील आरोग्य मंदिर रस्त्यावर रिक्षेला दुचाकीने धडक देत अपघात केला. या अपघातात दुचाकी चालकासह रिक्षा चालक व प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वा. सुमारास घडली.

 

 

 

फिर्यादी रिक्षा चालक लतीकेश कमलाकर भोरे हे आपल्या ताब्यातील रिक्षा ( एमएच -08-बीसी- 0494) घेऊन सोबत त्यांच्या शेजारी रहाणार्‍या लोकांना उपचारासाठी घेऊन येत असताना नाचणे-पॉवर हाऊस बसस्टॉप येथे आरोग्य मंदिरकडे वळत असताना मारुती मंदिरहून येणारी दुचाकी ( एमएच-08- एबी- 7705) वरील दुचाकी चालक आर्यन संतोष नागवेकर (20) याने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील प्रवाश्यांसह दोन्ही चालक जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.