वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांचे निलंबन रद्द

कणकवली वनक्षेत्रपालपदी फेरनियुक्ती

कणकवली : कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांचे सावंतवाडी उपवनसंरक्षक यांनी केलेले निलंबन नियमबाह्य ठरवत घुणकीकर यांना कणकवली वनक्षेत्रपाल पदी फेरनियुक्तीचे आदेश मॅट ने दिले. मॅट च्या आदेशानुसार राजेंद्र घुणकिकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार ४ नोव्हेंबर पासून स्वीकारला आहे. कणकवलीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना सावंतवाडी उपवनसंरक्षक यांनी नियमबाह्य पद्धतीने निलंबित केले होते. त्याविरुद्ध त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाद मागितली होती. त्यानुसार श्री घुणकी कर यांचे निलंबन रद्द करून पुनश्च वनक्षेत्रपाल कणकवली या पदावर हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे उप वनसंरक्षक सावंतवाडी यांनी दिलेल्या आदेशाला मॅटने दणका दिल्याचे मानले जात आहे. मेट ने दिलेल्या आदेशानुसार ४ ऑक्टोबर रोजी श्री घुणकीकर हे वनक्षेत्रपाल कणकवली या पदावर येथे हजर झाले आहेत