उत्तम लोकसंपर्क, विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणजे आमदार नितेश राणे
देवगड: शिरगाव शेवरे येथील उभाठाचे शाखाप्रमुख संजय लक्ष्मण घाडी यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे
देवगडचे उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख यांनाच दणका दिला असून त्यांच्या गावातील शाखाप्रमुख संजय लक्ष्मण घाडी यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. त्यांच्या समवेत उबाठाचे कार्यकर्ते संतोष मुरारी साटम यांनीही प्रवेश केला.
आमदार नितेश राणे यांच्या दौऱ्यात ते ज्या गावात जातात त्या गावात उबाठाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपामध्ये येण्याची इच्छा व्यक्त करतात.
शिरगाव येथे उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आमदार नितेश राणे म्हणजे नेता कसा असावा याचे उदाहरण आहे.
उत्तम लोकसंपर्क, विकासात्मक दृष्टी असलेला आमदार नितेश राणे सारखा दुसरा नेता नसल्याचे प्रवेश करताना म्हटले.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, पडेल मंडल विभागाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, देवगड मंडल विभागाचे तालुकाध्यक्ष राजू शेट्ये, युवा सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम, व भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.