The smallest three-dimensional sculpture of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj in Maharashtra!
कला शिक्षक समीर चांदरकर यांची कलाकृती
मसुरे | झुंजार पेडणेकर : जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उद्धार,बहुजनांचा शैक्षणिक विकास,
औद्योगिक प्रगती,शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजवणारे,
वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते,लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज…
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून संपूर्ण राज्यात साजरे केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर जवळपास दोन सेंटिमीटर उंचीचे महाराष्ट्रातील सर्वात लहान त्रिमितीय शिल्प साकारले आहे ते कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कला शिक्षक शिल्पकार श्री समीर चांदरकर यांनी. चांदरकर यांच्या कलाकृतीचे कौतुक होत आहे.