कोंडवाडी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार

The thrill of the Kondwadi Cup cricket tournament

६ व ७ मे रोजी रंगणार क्रिकेटचे सामने

पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी चषक २०२३ क्रिकेटचा थरार शनिवार दि. ६ व रविवार दि. ७ मे २०२३ रोजी कोंडवाडी तळी क्रिडांगणावर रंगणार आहे. पाटपन्हाळे कोंडवाडी येथे दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलच्या धर्तीवर खेळत असल्याप्रमाणे कोंडवाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व त्याप्रमाणे १० संघमालकांनी संघ खरेदी करुन प्रवेश घेतलेल्या १६० खेळाडूंना वर्गीकरण करुन चिठ्ठी पध्दतीने १० संघात विभागण्यात आले. हे सामने साखळी पध्दतीने होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना रोख रक्कम व आकर्षक चषक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटमन, मालीकावीर, सामनावीर अशी अनेक आकर्षक चषके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुले विशेष मेहनत घेत आहेत.