भाजपा युवा मोर्चा विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक
सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चा विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक सावंतवाडी येथे संपन्न झाली. युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. महायुतीचे उमेदवार मंत्री केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास लखमराजेंनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले, भाजपा युवा मोर्चा विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक आज पार पडली. पालकमंत्री रविंद्र चव्हाण व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. ३०० हून अधिक युवकचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा निर्धार यावेळी करण्यात आला. सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. त्यांचा विजय हा १०० टक्के निश्चित आहे असा विश्वास युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे जावेद खतिब, गोविंद प्रभू, बंटी पुरोहित, पराशर सावंत आदींसह युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते