मनसेला कोणीही संपवू शकत नाही

 

 

शृंगारतळीतील मनसेच्या सभेत वैभव खेडेकर यांचे प्रतिपादन

गुहागर प्रतिनिधी

गेल्या वीस वर्षांपासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करतोय या वीस वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले.अनेक जण तुमचा पक्ष संपला अस बोलतात जर का आम्हाला आमचा पक्ष संपला अस म्हणत असाल तर मग आमचा पक्ष फोडण्याची वेळ तुमच्यावर का येते.ज्यांना वीस वर्षांत मनसेला संपवता आले नाही ते आता काय भविष्यातही संपवु शकत नाही असा रोखठोक सवाल मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांनी केला.मनसे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

ते यावेळी पुढे म्हणाले की, गेल्या वीस वर्षांत अनेक ज्यांचे वडील आमदार होते जे स्वतः आमदार झाले आणि आता मुलांची वर्णी विधानसभेत लावत आहेत अशी अनेक लोक मी पहिली आहेत.परंतु आपल्यासारख्या लोकांमुळे मी राजसाहेबांना तीन वेळा यशाचा आनंद देऊ शकलो याचा मला आनंद होत आहे.या जिल्ह्यात खेड नगरपालिका व दापोली नगरपंचायत यामध्ये सातत्याने गेली 15 वर्षे मनसेची सत्ता आहे.बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे कोण असतील तर ते राज ठाकरे आहेत.बाकीच्या ठाकरेंबाबत मी बोलणार नाही अशी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांची खिल्ली उडवली. ते पुढे म्हणाले की आम्ही थेट भिडणारी लोक आहोत.अन्यायाला वाचा फोडणारे आहोत.केंद्रसरकार कोकणासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करतंय पण अजून तुम्ही कोकणाचा रस्ता करू शकत नाही असाही सवाल त्यांनी शेवटी उपस्थित केला