Twelfth installation anniversary ceremony of Sridevi Bhavani Mata at Konal
दोडामार्ग | प्रतिनिधी : कोनाळ येथील श्रीदेवी भवानी मातेचा प्रतिष्ठापनेचा बारावा वर्धापन सोहळा शनिवार दि.६ ते सोमवार दि.८ मे रोजी संपन्न होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
शनिवार दि. ६ मे रोजी रात्री ठीक ९.३० वाजता जय भवानी दशावतार नाट्य मंडळ कोनाळ यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग गयातीर्थ पंढरपूर हा आयोजित करण्यात आला आहे.रविवार दि.७ मे रोजी सकाळी ८.३० वाजता यजमानांची शरीर शुद्धी ,देवता प्रार्थना, गणेश पूजन, पुण्याहवाचन, ब्राह्मणावरण, स्थलशुद्धी, देवतास्थापना, कुंकूमार्चन,सप्तश्रृतीपाठ वाचन, महानैवेद्य व आरती होईल.सायंकाळी ठीक ६ वाजता भजन ,सायंकाळी सात वाजता ग्रामस्थांचे भजन ,रात्री ठीक ९.३० वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांच्या माही सागर तीर्थ दशावतारी नाट्यप्रयोग माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे
सोमवार दि.८ मे रोजी सकाळी. ८वाजता स्थलशुद्धी, सप्तश्रृतीपाठ हवन, कुंकूमार्चन, बलिदान, पुर्णाहुती, श्री सत्यनारायण पूजा, महानैवेद्य, महाआरथी, तीर्थप्रसाद, महागाऱ्हाणे, आशीर्वाद, ब्राह्मण संभावना, महाप्रसाद, दुपारी ठीक १.३० वाजता महाप्रसाद ,सायंकाळी ६ वाजता भजन, रात्री ठीक ८ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
तसेच रात्री ठीक ९ वाजता कै जयराम राणबाराव लोंढे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोफत वह्या वाटप राणबाराव जयराम लोंढे आणि बंधू भगिनी यांच्याकडून होणार आहे. रात्री ठीक १० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळ कवठी यांचा महिमा भवानी आईचा हा नाट्यप्रयोग होईल याशिवाय उत्सवाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे असे कोनाळ ग्रामस्थांनी म्हटले आहे.