स्नेहल सचिन बाईत यांचा सत्कार

Tribute to Snehal Sachin Bait

आबलोली | वार्ताहर : शिवसेनेचे तालुका प्रमूख सचिन बाईत यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्नेहल सचिन बाईत या कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा रत्नागिरी या निवडणूकीत १२६० अशा भरघोस मतांनी संचालक पदी विजयी झाल्याबद्दल विवीध कार्यकारी सोसायटी आबलोली – खोडदे या सोसायटीचे सदस्य व शिवसेनेचे तालुका सचिव विलास गुरव , खोडदेचे सरपंच लवेश पवार ,उपसरपंच कु. पूजा गुरव यांनी सौ. स्नेहल सचिन बाईत यांना शाल ,श्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या