दोडामार्गला भाजपा नेतृत्वाकडून भरीव निधी मिळवून देणार
भाजपा युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांचे आश्वासन
दोडामार्ग:सुहास देसाई:-
दोडामार्ग तालुक्यातील विकास कामासाठी निधी प्राप्त व्हावा तालुक्याचां सर्वागीण विकास व्हावा आपली सर्व मित्रमंडळी व भाजपा कार्यकर्ता म्हणून प्रयत्नशील असून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रयत्नांतून भाजप नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्याचे सहकारी चागलं काम करीत आहे. त्याची दखल निश्चितच भाजपा पक्ष घेईल व भविष्यात भरीव योगदान देऊन निधी दिला जाईल. तसेच दोडामार्ग वक्रतुंड मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते गेली १४ वर्षे चागलं काम करित असून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देत आहे. त्यांना आपले कायम सहकार्य राहील तालुक्यांत पहिल्यांदाच खुल्या रंगमंचावर कार्यक्रम होत असल्याने हजारों प्रेक्षकाची उपस्थिती सर्व काही दाखवून दिले आहे असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी केले.
दोडामार्गच्या वक्रत्रूंड मित्रमंडळाच्या ऐतिहासिक ‘दीपावली शो टाईम’चे शानदार उदघाटन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी श्रीफळ वाढवून केले त्यानंतर जिल्ह्यातील युवा उद्योजक तथा विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब याचं हस्ते आयडॉल स्पर्धेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले.
दोडामार्ग शहरातील वक्रतुंड मित्रमंडळ बाजारपेठ दोडामार्ग यांनी यंदा १५ व्या वर्षात पदार्पण करताना मुख्य बाजार पेठेत दोडामार्ग तिलारी रस्त्यावर खुल्या स्टेजवर या भव्य दिव्य शो टाईमचे आयोजन केले होते यासाठी मोठं योगदान देणाऱ्या उद्योजक विशाल परब यांच वक्रत्रूंड मंडळाने दोडामार्गात जल्लोषी स्वागत केले. विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘दोडामार्ग आयडॉल’ स्पर्धेचा शुभारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांनी प्रास्ताविक करताना गेली 14 वर्षे अनेकांनी आम्हाला मदत केली तसेच आपले योगदान दिले. यामध्ये विवेकानंद नाईक,सूरेश दळवी , अशा अनेकांनी मदत केली त्यामुळं कार्यक्रम होत गेले गणे काळात विशाल परब यांनी भेट दिली असता तालुक्यात भव्य दिव्य कार्यक्रम व्हावा यासाठी आपण पुढाकार घेतो असा शब्द दिला त्याप्रमाणे दीपावली शो टाइम खुला जागेत घेण्यात आला त्यासाठीच सर्वांनी सहकार्य करून उपस्थिती दाखऊन दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब यांनी दोडामार्ग तालुका बदलतो आहे बदलत आहे याचे श्रेय युवा भाजपा नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्याचे सहकारी यांना जाते पुढील काळात मोठया प्रमाणात विकास कामे व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी भाजपा कार्यकर्ता म्हणून मी ठामपणे आपल्या सगळ्याच पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी विवेकानंद नाईक यांनी नगराध्क्ष चेतन चव्हाण व वक्रतुंड मंडळाचे अध्यक्ष चागलं काम करीत आहे. त्यांना सगळ्याचे सहकार्य मिळतं आहे हे उपस्थिती वरून दिसत आहे. विरोध करणारे यांना त्याची जागा दाखवून दिली आहे. अशी कोपरखळी त्यांनी मारली माजी पंचायत समिती उपसभापती बाळा नाईक यांनी तालुक्यात भव्य दिव्य कार्यक्रम चेतन चव्हाण मित्रमंडळ करू शकतो हे दाखवून दिले आहे त्यांना शुभेछा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दोडामार्ग तालुक्यांत कार्यक्रम व्हावा यासाठी विशाल परब यांनी सांगितले आम्हीं पूर्ण सहकार्य करतो त्यामुळं हा कार्यक्रम होत आहे यासाठी तालुक्यातील जनतेने प्रेम दाखवून दिले त्याच्या मी आभारी राहीन तर भविष्यात असे भव्य दिव्य कार्यक्रम घेउन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर कला दालन, क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा केली.
शहरात पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी विविध मान्यवर व दाते, मित्रमंडळी यांचे सत्कार करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा उद्योजक बाबा टोपले, उद्योजक विवेकानंद नाईक, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला व बालकल्याण सभापती ज्योती जाधव, माजी सभापती लक्ष्मण नाईक, गणपत देसाई, माजी जि. प. आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, नगरपंचायत बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव, नगरसेविका क्रांती जाधव, सुकन्या पनवेलकर, स्वराली गवस, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, पांडुरंग बोर्डेकर, संजय खडपकर, संजना म्हावळणकर, वासंती मयेकर, चंदन गांवकर, यांसह मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, प्रकाश सावंत, राजेश फुलारी, विशाल मणेरीकर, समीर रेडकर, विशाल चव्हाण, गोकुळदास बोन्द्रे आदि उपस्थित होते. रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम सुरू होते तरी मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती.