“Gitangan” Gaurav Gatha special edition release ceremony and retirement felicitation ceremony is the life glory of Ganpat Panchal – Mrs. Lina Bhagwat
आबलोली | वार्ताहर : कायम हसतमुख आणि प्रसन्न चेहरा असणारे ,कामाचा कितीही व्याप वाढला तरी नाराजी व्यक्त न करता कींवा कुठचीही अडचण न सांगता दिलेले काम उत्साहाने पूर्ण करणारे आबलोली बिटचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. गणपत कृष्णा पांचाळ यांच्या कतृत्व सिध्द कार्याचा ठसा उमटलेली “गितांगण” गौरव गाथा ही पुस्तिका सर्व शिक्षकांनी फक्त १५ दिवसात तयार केली त्या पुस्तिकेतील लेख ,फोटो , तसेच भाषेचा लहेजा आणि सौंदर्य ठळक दिसून येत असून सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आणि “गितांगण”गौरव गाथा विशेषांकात श्री. गणपत कृष्णा पांचाळ यांचा जिवन गौरवच साकारलेला आहे असे स्पष्ट प्रतिपादन पंचायत समीतीच्या गटशिक्षण अधिकारी सौ. लिना भागवत यांनी मार्गदर्शन करताना केले
गुहागर तालुक्यातील आंबेरे गावचे सुपूत्र आणि आबलोली गावात नोकरी निमित्त स्थायीक झालेले आबलोली बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गणपत कृष्णा पांचाळ यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा आणि “गितांगण”गौरव गाथा विशेषांकाचे प्रकाशन सोहळा आणि जन्मदिन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम यशदा मंगल कार्यालय खोडदे( आबलोली – खोडदे रत्नागिरी रोड शेजारी) येथे श्री.गणपत कृष्णा पांचाळ सेवा निवृती गौरव समिती,आबलोली बिट मधील सर्व शिक्षक तसेच दत्तप्रसादिक भजन व नाट्य मंडळ आंबेरेखुर्द ,यांचे सर्वांचे सौजन्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तुकाराम निवाते यांनी भूषवीले त्यानंतर राष्ट्रपुरुष ,राष्ट्रमाता आणि महामानवांच्या प्रतिमेचे पूजन , दिपप्रज्वलीत करुन मान्यवरांच्याहस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर स्वर चैतन्य ग्रुप आबलोली पांचाळ बंधू यांचा सुमधुर भक्ती गितांचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी प्रमूख अतिथी म्हणून गौरवोदगार काढताना पंचायत समिती गुहागरच्या गटशिक्षणाधिकारी सौ. लिना भागवत पुढे म्हणाल्या की, गुहागर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात आबलोली बिटचे वर्चस्व आहे आबलोली बिट मला माझ्या माहेरा सारखे असून आपण मला इथे बोलावलेत गणपत पांचाळ यांचा सत्कार आणि “गितांगण”गौरव गाथा विशेषांकाचे माझ्या हस्ते प्रकाशन केलेत त्याबद्दल इथल्या संयोजकांना धन्यवाद देते पांचाळ सरांच्या प्रेमापोटी तुम्हीं सर्व बहूसंख्येने शिक्षक, शिक्षिका जमलेल्या अहात .माझ्या पहाण्यातला एवढा मोठा सेवानिवृत्तीचा गौरव समारंभ असून सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन गणपत पांचाळ सरांनी ११ महिण्यात अधिकारी पद उत्कृष्ठ पध्दतीने सांभाळलेच पण तिन शाळांना आदर्श पूरस्कार मिळवून दिले असे सांगून सौ. लिना भागवत यांनी गणपत पांचाळ सरांना शुभेच्छा दिल्या
यावेळी वासुदेव पांचाळ, कृष्णा पागडे , खानसर, ,रविंद्र कुळ्ये, परमेश्वर लांडे, महेंद्र रेडेकर , रामदास पांचाळ, प्राची जोशी ,डॉ. साईराज सुतार , गणेश सुर्वे ,निलेश पाटील, सौ. सायली पांचाळ, बजरंग गुरसळे , दिनेश जाक्कर ,सौ. गितांजली जाधव , कैलास शार्दुल ,पालकर , ग्रामसेवक बी. बी. सुर्यवंशी, आप्पा कदम, केंद्र प्रमूख विश्वास खर्डे, सौ. स्नेहल बाईत,सरपंच सौ. वैष्णवी नेटके ,तसेच सत्कार मुर्ती गणपत पांचाळ यांचेसह तुकाराम निवाते यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्यायावेळी व्यासपिठावर गटशिक्षणाधिकारी लिना भागवत , सत्कार मुर्ती गणपत पांचाळ , श्री.गणपत कृष्णा पांचाळ गौरव समिती अध्यक्ष तुकाराम निवाते ,उपाध्यक्ष दशरथ साळवी , सरपंच श्रीमती. वनिता डिंगणकर, सरपंच सौ. वैष्णवी नेटके , ग्रामसेवक बी. बी. सुर्यवंशी ,सौ. स्नेहल बाईत , रामदास पांचाळ , ,सदानंद पांचाळ , विजू आप्पा कदम, माजी केंद्र प्रमूख सिध्दार्थ जाधव , केंद्र प्रमूख विश्वास खर्डे, केंद्र प्रमूख लोहकरे, मनोहर पांचाळ, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक रोडे, पाडावे , विष्णू पांचाळ , वासुदेव पांचाळ , श्रीकांत पांचाळ, कैलास शार्दुल , अरविंद पालकर , प्रमोद नेटके ,महेंद्र रेडेकर ,सुधाकर उकार्डे,महेश सुर्वे, सुहास गायकवाड ,नंदू पवार , राजदत्त कदम , अमोल होवाळे, दिनेश जाक्कर आदी . मान्यवर उपस्थित होते
यावेळी गौरव समितीचे उपाध्यक्ष दशरथ साळवी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन बध्द सुत्रसंचालन सुहास गायकवाड यांनी केले . रत्नागिरी, चिपळूण , गुहागर तालुक्यामधून तसेच आबलोली बिट मधील विवीध संघटनांचे शिक्षक , शिक्षिका ,बंधू – भगिनी बहूसंख्येने उपस्थित होत्या