मळगाव घाटीत कचरा टाकणार्‍यांना आता सोलार कॅमेऱ्याची नजर

Google search engine
Google search engine

 

मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत नियोजन

कचरा फेकणाऱ्यावर होणार कडक कारवाई

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रेडी मार्गावरील मळगाव घाटीत कचरा टाकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना आखली असून येत्या काही दिवसात त्याची अंमलबजावणी होणार आहे.मळगाव घाटित काही दिवसातच सोलार सिसीकॅमेरे बसवण्यात येणार असून कचरा फेकणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

निसर्ग संपन्न मळगाव घाटीत सध्या अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. सावंतवाडी शहर तसेच ग्रामीण भागातूनही येजा करणारे वाहन चालक घाटीत कचरा फेकून निघून जातात. यात नेहमीच्या कचऱ्याबरोबरच फुटलेल्या काचा लाकडाचे तुकडे खिळे अशा धारदार वस्तू फेकल्या जातात. त्याचप्रमाणे शिल्लक राहिलेले दूषित अन्नपदार्थ, पोल्ट्रीवर कापलेल्या चिकनचे उरलेले दुर्गंधीयुक्त अवशेष हे देखील प्लास्टिक पिशव्यात भरून घाटात काढून टाकले जातात.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समिती पुढे सरसावली असून लवकरच या ठिकाणी वन विभागाच्या सहकार्याने सोलार सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेरात

चालत्या गाडीवरून कचर्‍याच्या पिशव्या फेकणार्‍या वहानांचा नंबर कैद झाल्यावर त्या नंबरच्या आधारे संबंधीतांवर कायदेशीर कारवायी करण्यात येईल.त्याच प्रमाणे संबंधीत व्यक्तीकडून संपूर्ण परिसराची साफसफाई करून घेतली जाईल.

आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून नैसर्गीक संपत्तीचे रक्षण करणे जिल्ह्याचे नागरीक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी असते. परंतू सामाजीक बांधीलकी विसरून स्वत:च्या घरातील कचरा सौंदर्याने नटलेल्या निसर्गाच्या ठिकाणी टाकून परीसर विदृप करण्याचे काम काही समाजकंटकांकडून होताना दिसत आहे.या समस्येवर वन समितीच्या मिटींगमध्ये सदस्य गजानन सातार्डेकर यांनी गांभिर्याने लक्ष वेधले. तसेच त्यावर तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच स्नेहल जामदार यांनी दिली. यावेळी उपसरपंच हनूमंत पेडणेकर, सदस्य गजानन सातार्डेकर,गुरूनाथ गावकर,अशोक बुगडे,वन अधिकारी व कर्मचारी श्री राणे,नानगीरे,वाघमारे उपस्थीत होते.

 

 

कचरा फेकणाऱ्यावर कडक कारवाई करणार – स्नेहल जामदार

मळगांव घाटीत गेल्या दोन चार दिवसात कचरा टाकताना पकडलेल्यांकडून टाकलेल्या कचर्‍यासोबत आजुबाजूचीपण साफसफाई करून घेतली आहे. त्यामूळे भविष्यात कचरा फेकणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे धोरण समितीने आखले असून हे प्रकार थांबतील असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.त्याच बरोबर घरातील कचरा मळगाव घाटीत फेकणार्‍यांना हे प्रकार थांबवावेत, असे आवाहन समिती अध्यक्ष स्नेहल जामदार यांनी केले आहे.

Sindhudurg