नागपूर-मडगाव स्पेशलला मुदतवाढ

खेड (प्रतिनिधी) कोकणं मार्गावर विदर्भातून धावणाऱ्या नागपूर-मडगाव स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने स्पेशलला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या स्पेशलच्या ५२ फेऱ्या धावणार आहेत.
आठवड्यातून दर बुधवार व शनिवारी आणि परतीच्या प्रवासात मंगळवार व रविवारी धावणारी स्पेशल कोकणातील प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. नागपूर – विदर्भातील प्रवाशांसाठीही स्पेशल किफायतशीर ठरत असल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पेशलला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत मुदतवाढ देण्यात आली आहे. ०११३९ नागपूर – मडगाव स्पेशलच्या २९ डिसेंबरपर्यंत २६ तर परतीच्या प्रवासातही २६ फेऱ्या धावणार आहेत.