मालवण युवा उप तालुका प्रमुख व बांदिवडे सरपंच आशू मयेकर व मालवण तालुका प्रमुख श्री महेश राणे यांनी उबाठा गटाला दिला धक्का
मसुरे( प्रतिनिधी ):मालवण युवा उप तालुका प्रमुख व बांदिवडे सरपंच आशू मयेकर व मालवण तालुका प्रमुख श्री महेश राणे, आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी बांदिवडे गावात उबाठा शिवसेना गटाला धक्का दिला असून येथील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून येथील शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. बांदिवडे गावातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार प्रवेश कर्त्या सर्व शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला.
विधान सभा प्रमूख श्री बबन शिंदे , तालुका प्रमुख श्री महेश राणे, व श्री राजा गावकर , श्री छोटू ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोष सावंत, विठ्ठल मुरकर, भिवा मुरकर, श्रीधर हडकर, भूषण टेंबुलकर,बबन मांजरेकर, प्रसाद म्हाडये, सुरेश मा डये, पांडुरंग मुणगेकर, अभिषेक मयेकर, यश मांजरेकर,अवी मुणगेकर , समर्थ मिठबावकर, हर्षद सावंत, तन्मय मयेकर, मयूर मिठबावकर, अक्षय ताम्हणकर, प्रथमेश मेस्त्री, आदित्य मिठबावकर यानी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर,उप विभाग प्रमुख अश्विन हळदणकर, आचरा शहर प्रमुख महेंद्र घाडी, लीलाधर मुणगेकर, आशिष चेंदवणकर,विकास आचरेकर, कुणाल हडकर, जगदीश चव्हाण, पुरुषोत्तम शिंगरे, तात्या हिंदळेकर, सचिन पाटकर, सुयोग राणे, सतीश मसूरकर, पंढरीनाथ मसुरकर, शिवाजी परब आदी शिव सैनिक उपस्थित होते.