वेंगुर्ले भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या अध्यक्षपदी अँड. श्याम गोडकर यांची निवड

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : प्रतिनीधी
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लेच्या तीन वर्षासाठी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडीत अध्यक्षपदी अँड. नारायण उर्फ श्याम गोडकर यांची उपाध्यक्षपदी वृंदा कांबळी व रमण वायंगणकर यांची सरचिटणीसपदी प्रा. आनंद बांदेकर यांची तर खजिनदार विकास वैद्य पदी एकमताने निवड करण्यातं आली.
वेंगुर्ले हॉस्पीटल नाका येथील स्वामी समर्थ कॉम्पलेक्स मधील मंडळाच्या कार्यालयात संचालक मंडळाची सभा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे सचिव विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी अँड. नारायण उर्फ श्याम जनार्दन गोडकर यांची पुढील तीन वर्षाच्या कालावधीकरीता एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिका सौ. वृंदा कांबळी व रमण वायंगणकर, सरचिटणीसपदी डॉ. प्रा. आनंद बांदेकर, खजिनदारपदी विकास वैद्य, सहचिटणीसपदी दिपक कोचरेकर, यांची एक्मताने निवड करण्यात आली.
या सभेला उपस्थितांत संचालक सुरेश बोवलेकर, सुरेश धुरी, जयराम वायंगणकर, चंद्रकांत गडेकर, प्रा. सचिन परूळकर, आनंद केरकर, बाळू फटनाईक, सौ. श्रेया मांजरेकर, सौ. अंकिता बांदेकर आदींचा समावेश होता.
या सभेत एकमताने निवडलेले भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लेचे अध्यक्ष अँड. नारायण उर्फ श्याम गोडकर यांचा समाज मंडळाचे मावळते अध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर यांनी सर्वप्रथम शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी रमण वायंगणकर म्हणाले. आपल्या भंडारी समाज मंडळास एक उच्च विद्याविभूषित अध्यक्ष लाभल्याने भंडारी समाज मंडळ हे नावारूपाला येण्यास मदत होणार आहे.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. श्याम गोडकर यांनी आपण सर्वानी एकमताने या पदासाठी मी योग्य आहे हा विश्वास दाखवत निवड केली. हा तुमचा विश्वास मी सार्थकी लावीन. भंडारी समाजाच्या उन्नतीस अनुसरून काम करताना सर्वाना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न करेन असे स्पष्ट केले.
यावेळी सुरेश बोवलेकर, सौ. वृंदा कांबळी, डाॅ. प्रा. आनंद बांदेकर, प्रा. सचिन परूळकर, बाळू फटनाईक विकास वैद्य यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण वायंगणकर यांनी तर आभाराचे काम दिपक कोचरेकर यांनी पाहिले.