हळवल फाट्यावरील ते स्टॉल दोन दिवसांत न हटविल्यास भाजपा स्टाईलने प्राधिकरण व यंत्रणेला जाग आणू..!

हळवल ग्राम. सदस्य तसेच भाजपचे कट्टर कार्यकर्ते सुदर्शन राणेंचा प्रशासन यंत्रणेला सवाल..!

कणकवली : हळवल फाट्यावरील वळण अपघातासह मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. असे असताना आजपर्यंत याठिकाणी अनेक अपघात झाले. मात्र आजपर्यंत झालेले अपघात हे रात्रौ ते पहाटे दरम्यान झाल्याने त्या ठिकाणच्या स्टॉल धारकांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यामुळे त्याचे गांभिर्य तेथील स्टॉल धारकांना नाही. मात्र आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जनतेसाठी आणि जनतेच्या हितासाठी झटत असतो आणि याच भावनेने प्रशासनाकडे या हळवल फाट्यावरील स्टॉल हटविण्याची मागणी केली. कारण,त्या ठिकाणी गिऱ्हाईकांची मोठी वर्दळ सुरू असते आणि तेथील भाग हा अपघात प्रवण क्षेत्र बनलेला आहे. त्या स्टॉल धारकांचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न नसून जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे. तसेच त्यांनी जीवितहानी होणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी आपले स्टॉल बिनधास्तपणे लावावेत. आम्ही त्याला विरोध करणार नाही अशा प्रकारचे निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आले होते.

If that stall on Halwal Phata is not removed in two days, we will wake up the authorities and the system in BJP style..!

कणकवली प्रांताधिकाऱ्यांना देखिल ३ ऑक्टोबर २०२२ रोजी भाजपा शिष्टमंडळ हळवल च्या वतीने कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले होते. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा अवलंबवावा लागेल असा इशारा देण्यात आला होता. याबाबतच्या रीतसर प्रति कणकवली पोलीस ठाणे तसेच प्रशासकीय कार्यालयात देखील सादर करण्यात आले होते. मात्र आताची वस्तुस्थिती पाहता त्या ठिकाणच्या स्टॉल धारकांना उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांचे पत्र आले असल्याची माहिती समोर आली असून हे पत्र येऊन पंधरा दिवस झाले आहेत. तरीही राजकीय कर्तृत्ववान नेत्यांनी अद्यापही त्या ठिकाणचे स्टॉल हटविले नाही.

प्रशासन यंत्रणेने याची पाहाणी तरी केली आहे का? असा सवाल हळवल ग्राम. पंचायत चे सदस्य तसेच भाजपचे कट्टर कार्यकर्ते सुदर्शन राणे यांनी उपस्थित केला आहे. जर प्रशासनाने पत्र देऊन पाहाणी केली तर त्या ठिकाणचे स्टॉल का हटविले नाहीत ? की प्रशासन यंत्रणा अंत पाहून आंदोलनाचा पवित्र हाती घ्यायला भाग पाडत आहे. येत्या दोन दिवसांत त्याठिकाणचे स्टॉल हटविले नाही तर भाजपा स्टाईलने प्रशासनाला खडबडून जागे करू असा इशारा देखील सुदर्शन राणे यांनी दिला आहे.

त्यामुळे आता प्रशासन यंत्रणा आणि हायवे प्राधिकरण विभाग अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.