शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार पाटकर यांची माहिती

आमदार नितेश राणे यांच्या शपथविधीचा आनंद सोहळा अनुभवा

देवगड भाजपा कार्यालयामध्ये सहक्षेपण

आमदार नितेश राणे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज नागपूर येथे शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सर्वसामान्य जनतेला पाहता यावे, यासाठी भाजपा कार्यालय जामसंडे येथे मोठ्या स्क्रीनवर करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी दिली आहे.

देवगडच्या पारड्यात इतिहासात पहिल्यांदाच मंत्रिपद मिळणार आहे. या आनंदसोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी नितेश राणे यांच्या चाहत्यांनी तसेच सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन योगेश पाटकर यांनी केले आहे.