यशाला कोणताही शॉर्टकट नसतो! उद्योजक डॉ दीपक परब यांचे प्रतिपादन

बागवे हायस्कुल मसूरेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

                                                              मसूरे | झुंजार पेडणेकर :                                                                      ही शाळा माझी आहे ही भावना प्रत्येकाने मनात बाळगावी . प्रशालेच्या मुलांची संख्या आणखी वाढण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. मुलांच्या काही समस्या असल्यास संस्थेपर्यंत पोहोचवा. संस्था तुमची आहे. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. बुद्धीला श्रमाची जोड द्या आणि जीवनात यशस्वी व्हा असे आवाहन मसूरे एज्युकेशन सोसायटी मुंबई अध्यक्ष उद्योजक डॉ दीपक परब यांनी येथे केले.

 

 

 

आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसूरेचे वार्षिक गुणगौरव कार्यक्रमादरम्यान संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ दीपक परब व संस्था कार्य.सदस्य उद्योजिका सौ. राधिका परब यांचा प्रशालेच्या वतीने लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष सौ सरोज परब, प्र. मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे, संस्था सदस्य दत्तप्रसाद पेडणेकर, श्री कांबळे, आप्पा परब, भरत ठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून मसूरे पोलीस विवेक फरांदे यांचा उद्योजक डॉ दीपक परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रशालेला 82 वर्षांची यशस्वी परंपरा लाभली आहे. आपली मुले काय करतात यावर शिक्षकांप्रमाणे पालकांनी सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. याप्रशालेमध्ये मल्टी स्किल फाउंडेशनचे कोर्स सुद्धा मुलांना शिकवले जात आहेत. ज्याचा फायदा मुलांना भविष्यात निश्चित होणार आहे. मुलांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी ध्येयनिश्चिती शालेय वयातच करणे आवश्यक आहे उद्योजक डॉ. दीपक परब यांनी यावेळी केले. यावेळी मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पंढरीनाथ मसूरकर, रमेश पाताडे, विशाखा जाधव, दयानंद पेडणेकर, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर, भरत ठाकूर,नामदेव जाधव, भानुदास परब, चरणदास फुकट, अनिल मेस्त्री, समीर नाईक, विवा तळाशीलकर,आर्या भोगले आदी उपस्थित होते. आभार भरत ठाकूर यांनी मानले.