मडुरा – सातार्डा मार्गावरील पूलाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

बांदा l प्रतिनिधी :मडुरा – सातार्डा जिल्हा मार्गावरील जय पारिपत्ये यांच्या घराजवळील पुलाचे भूमिपूजन निवृत शिक्षक जगन्नाथ पंडित यांच्या हस्ते संपन्न झाले. कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात वारंवार अडचणी निर्माण होत होत्या. माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या पुलासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती यावेळी जगन्नाथ पंडीत यांनी दिली.

 

यावेळी सातार्डा सरपंच बाळू प्रभू, उपसरपंच सौ. विशाखा पारीपत्ये, माजी सरपंच उदय पारीपत्ये, सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ, जयकुमार पारिपत्ये, ज्ञानदीप राऊळ, सागर राऊळ, संतोष गोवेकर, सातोसे माजी सरपंच वसंत धुरी, कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळु गावडे, माजी सरपंच आनंद परब, माजी उपसरपंच विजय वालावलकर, दिलीप परब, श्रीकृष्ण भोगले, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, रिक्षा व्यवसायिक पेद्रू डिसोजा, संभाजी परब, सागर गोठोस्कर, रमेश पंडित, शिवराम पंडित, महादेव राणे, बाबू पंडित, संदेश राऊळ, ठेकेदार मेहर पडते, भगवान रेडकर, रोहन रेडकर, आना रेडकर, रामा पेळपकर, आपा पारीपत्ये, संतोष पारीपत्ये, मिलिंद जाधव आदींसह मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

मडुरा – सातार्डा मार्गावरील जय पारिपत्ये यांच्या घराजवळील कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरून दररोज गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या शेकडो युवकांना याचा फटका बसत होता. त्यामुळे संघर्ष समिती कडून प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवीन पुलासाठी निधी मंजूर करण्यात आला.

———-