जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेंगुर्ले नं. १ या शाळेचे उद्या वर्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले शहरातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेंगुर्ले नं. १ या शाळेचा वर्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

वार्षिक बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता विठाई सभागृहात ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम (अण्णा) नाईक यांच्या अध्यक्षेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, वेंगुर्ले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, वेंगुर्ले, कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उद्योजक तथा माजी नगरसेवक उमेश बेरम, वेंगुर्त्याचे केंद्रप्रमुख महादेव आव्हाड उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी ५.३० वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून सामाजिक कार्यकर्त्या सीमा नाईक यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास नाईक यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.या आनंद मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष राकेश सापळे, प्रधान मंत्री आहिर प्रजापत, सांस्कृतिक मंत्री गुरुदेव दामले, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, सर्व शिक्षक वृंद व पालक यांनी केले आहे.