फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पावस येथे विशेष श्रम संस्कार शिबिर

रत्नागिरी : फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत पावस येथे विशेष श्रम संस्कार शिबिर संपन्न झाले.

शिबिराचे उदघाटन दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत पावस येथे देसाई उद्योग समूहाचे अमर देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या सौ. विदुलाताई गोडबोले, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. कौशल प्रसाद, एन एस एस प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. उमेश सामंत, एन एस एस महिला प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. हर्षा केळकर, एन एस एस कमिटी सदस्य प्रा. सचिन गुरव उपस्थित होते. या प्रसंगी देसाई उद्योग समूहाचे अमर देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य कौशल प्रसाद यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मौलिक मार्गदर्शन केले. या शिबिरांतर्गत गावातील रस्त्यांची साफसफाई, बंधारे बांधणी, शाळेमध्ये श्रमदान, विदयार्थी प्रबोधन, महिला वृद्धाश्रम येथे महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आदी कार्यक्रम राबवण्यात आले.

शिबीर कालावधीमध्ये प्रा. राजकुमार तिवाटणे, गजानन करमरकर, दीपक आंबवले, प्रा. बाबासाहेब सुतार, जयंतराव देसाई यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे निरनिराळ्या विषयांवर उद्बोधन केले.

शिबिरादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. राहुल मराठे यांनी शिबिरास भेट देऊन स्वयंसेवकांस मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप रविवार दिनांक ०८ जानेवारी २०२५ रोजी प्रमुख पाहुणे देसाई उद्योग समूहाचे जयंतराव देसाई तसेच स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे हेमंत गोडबोले, ग्रामपंचायत सरपंच सौ. चेतना सामंत, उप-सरपंच प्रवीण शिंदे, ग्रामविकास अधिकारी श्री. गुरव यांच्या उपस्थितीत पार पडला.
या शिबिरासाठी ग्रामपंचायत पावस तसेच श्री. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले.
एन एस एस प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. उमेश सामंत, एन एस एस महिला प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. हर्षा केळकर, एन एस एस कमिटी सदस्य प्रा. सचिन गुरव यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वीरीत्या संपन्न केले.