सावंतवाडी । प्रतिनिधी : आजगांव येथील श्री देव
अग्नी वेताळ देवतेचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दि. ९ फेब्रूवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी समस्त भक्तांनी देवतेच्या उत्सवाला उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव अग्नीवेताळ देवालय ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.











