सावंतवाडी : मुंबई येथे पार पडलेल्या एड्यु स्मार्ट इंकच्या नॅशनल अबॅकस ड्रॉइंग व हॅन्ड रायटिंग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भटवाडी सावंतवाडी येथील फ्लाईंग टॉटस् स्कूलचा विद्यार्थी कार्तिकेय अजय निकुम याने जुनियर गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या परीक्षेला भारत भरातून हजारो विद्यार्थी बसले होते.
दरम्यान, याच स्कूलच्या शारवी शुभम नाईक हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. तर याचबरोबर नॅशनल ड्रॉइंग स्पर्धेत किमया अमित राऊळ हिने सीनियर गटात दुसरा क्रमांक तर चातुरिया नितीश धारगळकर हिने ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक मिळविला. तर गिरीधर नित्यानंद कोरेगावकर -अबॅकस, निधी मनोज गुंजाळ -अबॅकस व श्रीशा राजेश गवस ड्रॉईंग तसेच रियांश विकास राणे ड्रॉईंग हे रीजनल ॲचिवर्स ठरले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रिन्सिपल व पालकाने अभिनंदन केले आहे.












