वेरळ पुनम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक जाधव

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरळ येथील पुनम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली दगडू पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हि निवड करण्यात आली आहे. याचवेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीचीहि निवड करण्यात आली आहे.
सेक्रेटरी म्हणून प्रथमेश राठोड व खजिनदार म्हणून दिपक चांदणे यांची निवड करण्यात आली आहे .यावेळी सचिन देवरुखकर , एकनाथ रामपुरकर, राजाराम शिंदे, सचिन शिरीषकर, सुभाष शिरीषकर, कामिनी शिरीषकर, अमिता कदम, अक्षय कदम, शशिकांत आंब्रे, शुद्धोधन कदम, राजीव पासवान आदी सभासद उपस्थित होते. संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे  सर्व सभासद व सदनिकाधारकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या