औरंगजेब वर केलेली स्तुतीसुमने भोवली,
विधानसभेत सत्ताधारी आमदारांची छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा बाजीने सभागृह दणाणले
संतोष राऊळ (विधानसभा )समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्प अधिवेशन 2025 संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निलंबनाचा प्रस्तावात ठेवला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात हा निर्णय ठेवला. सर्वांच्या मते ते संमत झाला.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय..छत्रपती संभाजी महाराज की जय.., हर हर महादेव…! अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. दरम्यान काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी अबू आझमी यांची बाजू घेत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी अशा सत्ताधारी आमदारांनी घोषणा देत अध्यक्षाच्या समोरील वेल मध्ये एकत्र आले आणि अबू आझमी,यांच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान काँग्रेस, उबाठा , शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुध्दा घोषणेला घोषणा देत होते. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे काम चालूच ठेवले. आणि निलंबन निर्णय अंतिम केला. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी अबू आझमी यांना कायमचे निलंबित करा अशी मागणी केली.
अबू आझमी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पहिल्या सत्ताधारी पक्षाने आग्रह धरला होता.आज अध्यक्षाच्या समोरील वेल मध्ये आमदार एकत्र येऊन घोषणा देत होते, त्यात शिवसेना आमदार निलेश राणे अग्रेसर होते. आवेशपूर्ण घोषणा देताना ते पहावयास मिळाले.











