दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य सुविधा लवकरात लवकर सोडवण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आश्वासन.

वैभव इनामदार यांनी घेतली भेट

दोडामार्ग l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स विकास आणि बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यांची ओरोस येथील जनता दरबार मध्ये दोडामार्ग मधील ग्रामीण रुग्णालय मधील समस्या हेल्पलाइन ग्रुपचे अध्यक्ष वैभव ईनामदार यांनी मांडल्या आहेत यावेळी याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी दिले असल्याचे वैभव ईनामदार यांनी स्पष्ट केले.

याबाबत सविस्तर माहिती देताना सागितलं की,दोडामार्ग रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ आणि हृदय रोग तज्ञ तात्काळ भरावेत,तालुक्यात हृदय रोगाचे रुग्ण संख्या दिवसान दिवस वाढत चालली आहे, त्या रुग्णावर प्राथमिक स्वरूपात उपचार होण्यासाठी हृदय तज्ञ डॉक्टर कायम स्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे, तसेच तालुक्यात डायलेसेस रुग्ण जास्त असल्याने त्यांना गोवा राज्यात डायलेसेस साठी जावे लागते, त्यामुळे त्या रुग्णाना आणि त्यांच्या नातेवाईकना मानसिक त्रास सहन करावे लागतो, त्यामुळे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात डायलेसेस सेंटर उभारावे या सर्व मागण्या पालकमंत्री मा.नितेश राणे साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.

डायलेसेस सेंटर लवकरात लवकर दोडामार्ग येथे चालू होईल, तसेच स्त्री रोग तज्ञ् आणि हृदय रोग तज्ञ ही रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील तशा सूचना संबंधित अधिकाऱ्याना तात्काळ देण्यात आल्या.

यावेळी श्री. वैभव इनामदार -अध्यक्ष दोडामार्ग ता. हेल्पलाईन ग्रुप श्री. सुधीर दळवी भाजपा तालुका अध्यक्ष. श्री. आनंद तळणकर -भाजपा उपाध्यक्ष श्री. परशर सावंत भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष

श्री. दीपक गवस दोडामार्ग तालुका भाजपा युवा पदाधिकारी आदि उपस्थित होते.,