उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्गात

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

मालवण : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने जे यश प्राप्त झाले. त्याबाबत जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आभार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.