खेड(प्रतिनिधी)
ग्राहकांसाठी हितकारक नवनव्या योजना राबवत त्यांच्या विश्वासार्हतेस पात्र ठरलेल्या भरणे येथील श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षात ९६ कोटी ३१ लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. यातून पतसंस्थेने ६४ लाख ८३ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. आर्थिक वर्षात १५० कोटी एकत्रित व्यवसायांचे उद्दिष्ट असल्याची माहिती पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी दिली.
पतसंस्थेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५३ कोटी ९० लाख इतक्या ठेवी आहेत. कर्ज वाटप ४२ कोटी ४१ लाख केले असून १६ कोटी ५६ लाख इतकी गुंतवणूक आहे. संस्थेचा सीडी रेशो ७१.३८ असून ३.७२ इतके थकबाकीचे प्रमाण आहे. संस्थेचा १६.२५ व एसएलआर ३०.७२ इतका आहे. शासनाने निलंबित केलेल्या परिपत्रकानुसार आदर्श प्रमाणही राखले आहे. सामाजिक बांधिलकीतून पतसंस्था सामाजिक
उपक्रमही राबवत आहे. याचंमुळे पतसंस्था नावारुपास येत असून प्रगतीचा आलेखही उंचावत आहे. या प्रगतीत सर्व संचालक मंडळ, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे यांनी सांगितले.










