मालवण : मालवण बसस्थानक नव्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून येथील जीर्ण व धोकादायक बनलेली जुनी इमारत पाडण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित एजन्सीने सुरु केली आहे. आमदार निलेश राणे यांनी आठ दिवसांपूर्वी मालवण बसस्थानक नव्या व जुन्या दोन्ही इमारतीची पाहाणी करून आढावा घेतला होता. त्यावेळी जुनी धोकादायक इमारत लवकरात लवकर पाडण्याची कार्यवाही करावी. अश्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाहीस सुरवात करण्यात आली आहे.
मालवण बसस्थानक जुनी इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. जुन्या इमारतीतील साहित्य नव्या इमारत ठिकाणी नेण्यात आले असून प्रवासी वर्गालाही त्याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच नवी सुसज्ज इमारत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
दरम्यान याठिकाणी सेल्फी पॉईंट, हायमास्ट टॉवर उभारणीही केली जाणार आहे. प्रवासी वर्गाच्या दृष्टीने अधिकाधिक सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहील. असे आमदार निलेश राणे यांनी यापूर्वीच पाहाणी दरम्यान स्पष्ट केले आहे.












