७५ व्या वाढदिवसाचा सोहळा साजरा करण्याची संधी चिपळूणला मिळावी
देवरूख (प्रतिनिधी): खासदार नारायण राणे म्हणजे एक आक्रमक आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या अनेक बैकांमधील विविध मुद्यांवरिल अभ्यासपुर्ण टिप्पणी ऐकल्या की त्यांची अभ्यासूवृत्ती नेहमीच दिसून येते. तर राज्यात मंत्रालय असो वा अन्य कोणतेही ठिकाण असो तीथे खा. नारायण राणे यांचे नुसते नाव जरी घेतले तरी कोणतेही काम चुटकीसरशी होते इतका त्यांचा दबदबा आणि दरारा आहे अशा शब्दात चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी खा. राणे यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव केला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूख येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळयात आ. निकम बोलत होते.
आपल्या काम आणि कार्याने खा. राणे यांनी राज्य व देशपातळीवर आपला हा दरारा व दबदबा निर्माण केलेला आहे. असे नेतृत्व आंम्हाला लाभले हे आमचे भाग्य असल्याचे नमुद करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र ना. नितेश राणे व आमदार निलेश राणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कायमच कोकणचा विकास झाला पाहिजे या भावनेतुन काम करतात. त्यांना आरोग्य संपन्न असे दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देताना त्यांचा आजचा वाढदिवस माझ्या मतदार संघात देवरूख येथे होत आहे ही अत्यानंदाची बाब आहे मात्र आता त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा सोहळा देखील आंम्हाला चिपळूण येथे साजरा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा यावेळी आ. निकम यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनीही आपले मनोगत व्यक्त करत खा. राणे यांना शुभेच्छा दिल्या.












