सिंधुदुर्ग – महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत कर्नाटक राज्यातील परप्रांतीय मासेमारी नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ‘जलदुर्ग 2’ नावाची ही नौका महाराष्ट्राच्या जलमर्यादेत अनधिकृत मासेमारी करताना आढळून आली.
सदर नौकेची नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-5938 असून, ती डेरिंन प्रशांत (रा. भटकल, कर्नाटक) यांच्या मालकीची आहे. नौकेवर तांडेल चंद्रशेखर गोविंद मोगर (रा. भटकल, कर्नाटक) याच्या नेतृत्वाखाली एकूण ७ जणांचा कर्मचारी दल (१ तांडेल, ६ खलाशी) उपस्थित होता. सर्वजण भटकल (कर्नाटक) येथील रहिवासी असून, सर्वांकडे वैध आधार ओळखपत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही नौका वायरलेस सेट आणि जीपीएस प्रणालीने सुसज्ज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नौकेला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित अधिकृत कारवाई अंमलबजावणी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
—











