OTAVNE: राजा शिवाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल १००टक्के.

Raja Shivaji Vidyalaya 10th result 100 percent.

ओटवणे(प्रतिनीधी) राजा शिवाजी विद्यालय विलवडे या हायस्कूल चा १०वी शालांत परीक्षेचा निकाल १००टक्के येवढा लागला असून परीक्षेस प्रविष्ट सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रशालेमधून सानिका सोनू दळवी हिने ९३.२०टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला तर सानिका लक्ष्मण दळवी ९१.४०तक्क्यांसह द्वितीय तर अनुजा विनायक दळवी ही ९०.८०टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेची १००टक्केची यशस्वी परंपरा राखत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सर्वांचेच अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या या वर्षीही गेल्यावर्षी प्रमाणे प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांकावर विध्यर्थिनिनी बाजी मारली . या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष संभाजी दळवी, उपाध्यक्ष दिलीप दळवी, सचिव सूर्यकांत दळवी स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत,ग्रामस्थ, मुख्याध्यापक बुद्ध भूषण हेवाळकर सर , शिक्षवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात.