Lanja: राहुल तांबे अपघाती नृत्य प्रकरणाची होणार आता थेट अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी

The Rahul Tambe accidental dance case will now be directly investigated by the Upper District Superintendent of Police

पालकमंत्री उदय सामंत यांचे जनता दरबार आश्वासन

लांजा  |  प्रतिनिधी : तालुक्यातील निओशी गावचा तरुण राहुल तांबे याच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची चौकशी आता थेट अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून होणार असून तसे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार प्रसंगी दिले आहेत.

निओशी गावचा तरुण राहुल तांबे याचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला होता. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा लांजा पोलीसांकडून तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी लांजा येथे पार पडलेल्या जनता दरबारात निओशी गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष साठले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता .राहुल तांबे याच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ही चौकशी नि:पक्षपातीपणे व्हावी. त्यानंतर जो अहवाल येईल तो आम्हाला मान्य असेल असे साठले यांनी सांगितले. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी सदरचा तपास हा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यामार्फत केला जाईल, आणि एका महिन्याच्या आत त्याचा अहवाल तुम्हाला सादर केला जाईल असे ठोस आश्वासन दिले आहे.

आता खुद्द पालकमंत्री यांनीच या प्रकरणाचा तपास अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यामार्फत केला जाईल असे ठोस आश्वासन दिल्याने निओशी गावच्या लोकांच्या आशा अपेक्षा उंचावल्या आहेत.