व्यवसायाची ओळख व यशाचे मूळ साधन म्हणजे व्यापार व त्याचे बोधचिन्ह होय.— प्राचार्य पुरंदर नारे

फोंडाघाट महाविद्यालयात “व्यापार चिन्ह व बोधचिन्ह” विषयावर भित्तीपत्रिका प्रकाशन !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील वाणिज्य विभागामार्फत “व्यापार चिन्ह व बोधचिन्ह म्हणजे काय ?त्यांचे महत्त्व व डिझाइन” या विषयावर माहितीपूर्ण भित्तीपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते करण्यात आले.या भित्तीपत्रिकेत विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांची व्यापार चिन्हे (Trade Mark) व बोधचिन्हे (Logo) साकारून त्यामागील माहिती सादर केली. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नारे म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात व्यापार चिन्ह व बोधचिन्ह ही केवळ ओळख नसून व्यवसायाच्या यशाचे मूळ साधन आहेत. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांचे

महत्त्व अमूल्य आहे.

 

 

 

भित्तीपत्रिकेच्या निर्मितीत प्रा. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. माहिती संकलन, सजावट आणि मांडणीची जबाबदारी विद्यार्थिनी कु. काशी सावंत, कु. संजना सांडीम, कु. सायली पेडणेकर आणि कु. देवदीप परब यांनी पार पाडली.वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. बाजीराव डाफळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यातही अशा माहितीपूर्ण व सर्जनशील उपक्रमांना चालना देण्याचे आश्वासन दिले….