सावंतवाडी । प्रतिनिधी : संजू परब हा आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात घडलेला कार्यकर्ता आहे. सदैव त्यांच्या सानिध्यात असल्याने त्यांच्या परिसस्पर्शाने संजू उजळून निघाला आहे. एका सामान्य कार्यकर्त्यापासून संजू परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यातही त्यांनी आपल्या कामाची धडाडी अशीच सुरू ठेवावी, त्यांच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल, अशा शब्दांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने संजू परब यांच्या कामाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे, ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे काम करत आहेत.
संजू परब यांनी अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट नियोजनबद्ध काम केले. त्यामुळे आ. केसरकर यांच्या विजयात संजू चा निश्चितच मोठा वाटा आहे. दिलेली जबाबदारी मनापासून पूर्ण करणे ही त्यांची खासियत राहीली आहे. त्यामुळे भविष्यातही त्यांनी मोठी मजल मारावी अशी इच्छा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली.
ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री
खा. नारायण राणे यांच्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व कोणीही करू शकत नाही. राणे साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात, त्या त्या ठिकाणी त्यांचे समर्थक जातात. राणे प्रेम आणि त्यांच्या परिवारावर विश्वास ठेवूनच आम्ही सर्वजण काम करतो. त्यामुळे आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही मनाने आम्ही सर्वजण एकत्रच आहोत. त्यामुळेच सिंधुदुर्गसह कोकणात महायुतीला यश मिळाले असून भविष्यातही सिंधुदुर्ग सह कोकणात महायुतीच भक्कम राहील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आ. निलेश राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्रित ठेवले आहेत, जे सोपे काम नाही. पराभूत झाल्यानंतरही त्यांनी दहा वर्षे कार्यकर्त्यांना एकसंध ठेवले आणि आता विरोधकही त्यांच्या कामामुळे गोंधळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुशीत तयार झालेला संजू परब यांच्यासारखा कार्यकर्ता कधीही मागे राहणार नाही. संजू परब यांचे भवितव्य निश्चितच उज्वल आहे, अशा शब्दात त्यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.











