गोवा बनावटीची दारू जप्त : वैभववाडी पोलिसांची कारवाई

करुळ तपासणी नाक्यावरील घटना

वैभववाडी | प्रतिनिधी
गोवा बनावटीची दारू अवैद्य रित्या वाहतूक करणा-या सुहास विष्णू शेलार (रा. वेळगिवे ता. देवगड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास करूळ चेक नाक्यावर ही कारवाई करण्यात आली.
शेलार हा वैभववाडी ते गगनबावडा कोल्हापूर जाणाऱ्या एम एच ४८ सी बी ११११क्रमांकाच्या लक्झरी बस मधून प्रवास करित होता. बस करूळ चेक नाक्यावर आली असता तेथे ड्युटीस असलेले पोलीस हेड काँस्टेबल संदीप कांबळे यांनी बसची तपासणी केली. यावेळी या बस मधून प्रवास करणारे सुहास शेलार यांच्याकडे गोवा बनावटीच्या 46  प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या सापडल्या.या प्रकरणानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शैलेश कांबळे करित आहेत.