पीएम स्‍वनिधी योजनेचा फेरीवाल्यानी लाभ घ्‍यावा : वेंगुर्ले नगरपरिषद चे आवाहन

 

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्‍मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्‍वनिधी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा कर्ज कालावधी वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तरी शहरातील फेरीवाले त्‍यामध्‍ये भाजी विक्रते, फळ विक्रते, मच्‍छी विक्रते, खाद्यपदार्थ विक्रते, हातगाडीधारक असे रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा बसणारे सर्व फेरीवाले यांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

शासनाकडून या योजनेत सुधारणा करण्‍यात आलेली असून कर्जमर्यादा रु. १०,०००/- वरुन रु. १५,०००/- आणि दुस-या टप्‍प्‍यातील कर्जमर्यादा रु. २०,०००/- वरुन रु. २५,०००/- एवढी वाढविण्‍यात आली आहे. तिस-या टप्‍प्‍यातील कर्जमर्यादा ५०,०००/- आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा. डिजिटल व्‍यवहार करणा-या फेरीवाल्‍यांना कॅशबॅक मिळणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.