माजी खासदार निलेश राणे यांचे
पालक व ग्रामस्थ यांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : कणकवली ते किर्लोस एसटी बसच्या नियोजित ३ फेर्या बंद असल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत होती. याबाबत किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, ग्राप सदस्य प्रवीण घाडीगांवकर, भाजप कार्यकर्ते बाळा लाड, दिलीप घाडीगांवकर, कृष्णा घाडीगांवकर व ग्रामस्थ यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, निलेश राणे यांनी तात्काळ एसटी प्रशासनाशी संपर्क साधून कणकवली किर्लोस बंद बसफेऱ्या सुरू करण्याबाबत सांगितले. निलेश राणे यांचा बुधवारी एक फोन आणि गुरुवारी किर्लोस मार्गावरील बंद बस फेऱ्या एसटी प्रशासनाने सुरू केल्या आहेत. विध्यार्थी व प्रवासी यांची गौरसोय दूर झाल्याने पालक व ग्रामस्थ यांच्या वतीने निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले.
फोटो : किर्लोस मार्गावरील बंद बस फेऱ्या निलेश राणे यांच्या सुचनेनंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत. (अमित खोत, मालवण)