स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासाला भरभरून प्रतिसाद प्राप्त होत आहे. पहिल्या २५ दिवसात १३ कोटींच्या नवीन ठेवी पतसंस्थेच्या विविध योजनांमध्ये संकलित झाल्या.
स्वरूपानंद पतसंस्थेच्या १७ ही शाखांमध्ये मोठी गुंतवणूक ठेवीदार करत आहेत. प्रधान कार्यालयात २ कोटी ५० लाख, मारुती मंदिर शाखेत १ कोटी ७१ लाख तर राजापूर शाखेत १ कोटी ७० लाखांची ठेव संकलित झाली आहे. एकूण ९०० खातेदारांनी ही रक्कम गुंतवली असून त्यातील १३५ ठेवीदार हे नव्याने स्वरूपानंद पतसंस्थेशी जोडले गेले आहेत.
पतसंस्थेबाबत असणारी विश्वासार्ह भावना ठेवीदारांचा अतुट विश्वास प्राप्त करत आहे. उत्तम ग्राहक सेवा तसेच गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित वातावरण देत असताना आकर्षक व्याजदर देऊन स्वरूपानंदने ठेवीदारांच्या मनात मोठे स्थान निर्माण केले आहे.
अद्यापही या ठेव वृद्धी मासाचे ५ दिवस बाकी आहेत. या ५ दिवसात १५ कोटींचं लक्ष सहज साध्य करीत संस्था आणखी पुढे मार्गक्रमण करेल. ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संस्थेसाठी ऊर्जास्त्रोत ठरत आहे.
उर्वरित ५ दिवसात मोठी गुंतवणूक करण्याची संधी ठेवीदारांनी साधून स्वरूपानंदच्या विविध योजनात गुंतवणूक करावी असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.