ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे देवुळवाडी येथिल ज्ञानेश्वर गुणाजी गावकर यांच्या राहत्या घरावर काजीचे भले मोठे झाड कोसळून मोठें अर्थिक नुकसान झाले आहे. सर्वत्र कोसळत असणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून ओटवणे दशक्रोशित ही अनेक लहान मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे गावकर कुटुंबीयाचे यात मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.












