वेंगुर्ले येथे ३० जुलै ला श्री चिंतामणी संगीत विद्यालयाचा “गुरू अभिवादन सोहळा”

वेंगुर्ले : प्रतिनिधी :वेंगुर्ले येथील श्री चिंतामणी प्रतिष्ठान संचलित गुरुवर्य श्री. निलेश पेडणेकर यांच्या श्री चिंतामणी संगीत विद्यालयाचा “गुरू अभिवादन सोहळा” रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, माणिक चौक, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यामध्ये सकाळच्या सत्रात विद्यालयाचे विद्यार्थी तबला व पखवाज वादन सादर करणार आहेत. दुसऱ्या सत्रात पुणे येथील गायक श्री. तेजस मेस्त्री व साटेली येथील गायक श्री. सत्यनारायण कळंगुटकर यांचे सुमधुर गायन होणार आहे. तरी सर्व संगीत प्रेमी व रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विद्यालयाच्या विद्यार्थी वर्ग कडून करण्यात आले आहे.