वेंगुर्ले न.प.मागासवर्गीय कल्याण समिती सभापती पदी युवराज जाधव यांची निवड…

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मागासवर्गीय कल्याण समिती सभापती पदी नगरसेवक युवराज जाधव यांची निवड सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ६७ नुसार मागासवर्गीय कल्याण समिती कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये गटित करण्यात आली. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रणव वायांगणकर, गौरी मराठे, सचिन शेट्ये, गौरी माईणकर, युवराज जाधव, संदेश निकम, सुधीर पालयेकर, विनय नेरुरकर, शीतल आंगचेकर, आकांक्षा परब, रिया केरकर, सुषमा प्रभूखानोलकर, काजल कुबल, लीना म्हापणकर, समिधा रेडकर, सुमन निकम, सदानंद गिरप, रवी शिरसाट, प्रीतम सावंत, प्रशांत आपटे, दाजी परब यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या समितीच्या सभापतीपदी प्रथम युवराज जाधव यांची निवड करण्यात आली. त्यानंतर समितीमध्ये एकूण चार सदस्य असणार असल्याने त्या जागी सदस्य म्हणून नगरसेवक सुधीर पालयेकर, शीतल आंगचेवर, रवी शिरसाट आणि समिधा रेडकर यांची निवड करण्यात आली. सर्वांचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी अभिनंदन केले.