देवगड( प्रतिनिधी )येथील देवगड तालुका मुख्याध्यापक संघाने स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधून तालुक्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 2 सप्टेंबर रोजी जामसंडे हायस्कूल येथे स१० वा आयोजित केलेला आहे
याप्रसंगी ज्या शाळेतील चित्रकला शिक्षकांनी या स्पर्धेला विशेष योगदान दिलेले आहे अशा चित्रकला शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार होणार आहे यामध्ये गिर्ये ,किंजवडे, मुटाट ,जामसंडे, इंग्लिश मीडियम, पडेल ,शिरगाव ,देवगड ,कोळोशी वाडा, तळेबाजार ,या शाळेतील चित्रकला शिक्षकांचा गौरव होणार आहे. तरी विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी , चित्रकला शिक्षकांनी, तसेच पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे याचवेळी तालुका कार्यकारणीची सभा होणार आहे तरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवगड तालुकाध्यक्ष श्री दिलीप घरपणकर व सचिव माधव यादव तसेच सर्व तालुका कार्यकारिणीने केलेले आहे










