हरिचरणगिरी येथील समुद्रकिनाऱ्यावर पुरुष जातीचा मृतदेह आढळला…

वेंगुर्ले : दाजी नाईक : वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी येथील समुद्रकिनाऱ्यावर ठाणे वसई चेतन मधुसूदन सामंत -वय ५५ नामक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह वेंगुर्ले पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला आहे.
सदर मयत व्यक्तीकडे सापडून आलेल्या आधार कार्ड नुसार ती व्यक्ती ठाणे वसई येथे राहणारी असल्याचे कळून येते. तरी त्यांचे कोण नातेवाईक असतील तर त्यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.