परराज्यातील लोकांकडून आमच्या सर्वधर्मीय समोख्याला निर्माण केली जाते बाधा, व्यक्त केली खंत
पोलिसांना निवेदन देत मुस्लिम समाजाने कारवाईची केली मागणी
कणकवली : पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा स्टेटस ठेवून पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्या,तसेच हिंदू देव देवतांचा अपमान होईल असा स्टेटस ठेवणाऱ्या त्या प्रवृत्तीचा कणकवली तालुका मुस्लिम समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.कणकवली व जिल्ह्यात स्थानिक मुस्लिम व इतर धर्मियांबाबत कधीही आपसात मतभेद नाहीत असे असताना बाहेरील लोक असे कृत्य करत असतील तर कारवाई करा अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.सदर व्येक्ति ही कणकवली तालुक्यातील नसून बाहेरील राज्यातून आलेली आहे. आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरी करणेबाबतचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. तसेच हिंदू देवतांबद्दल अपमानित करणारा स्टेटस ठेवून तो मिडीयामध्ये प्रसिद्ध केला. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने तिचेवर कारवाई करणेकरीता आपलेकडे का अर्ज दाखल झालेला असून सखोल चौकशी करावी. आजतगायत कणकवली तालुक्यातील स्थानिक मुस्लिम व स्थानिक इतर धर्मियांबाबत कधीही आपसात मतभेद नाहीत. सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. फक्त कणकवली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वधर्म समभावात चालतो याचे राज्यात आदर्श उदाहरण आहे.अशी परिस्थिती असताना एखादी विशिष्ट व्यक्ती गैरकृत्य करीत असेल तर त्या व्यक्तीबाबत सखोल चौकशी होवून त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
भारतीय राज्य घटनेने सर्व धर्मियांना समान अधिकार दिलेला आहे. त्याचे पालन करून सर्व धर्मियांचा आदरभाव करणे हे कायद्याने आवश्यक आहे. सदरचा झालेला प्रकार हा खरोखरच लांच्छनास्पद आहे. सामाजिक बाधा निर्माण करणारा आहे. त्यामुळे चुकीचे टेटस ठेवून तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.












