रत्नागिरी: साहित्य आणि वाचन चळवळ वाढीस लागावी, या हेतूने कार्यरत असणार्या जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयीन आणि खुला अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.
महाविद्यालयीन गटासाठी: 1.आर्टीफिशीएल इंटेलिजेस : शाप की वरदान?, 2. ध्येयनिष्ठा आणि ध्येयपुर्ती, 3. कोकण विकासाची ‘ब्लू प्रिन्ट’, 4. दिड जीबी डेटा.. का आयुष्य वाया घालवतो बेटा..?, असे विषय आहेत. तर खुल्या गटासाठी: 1.कोकण विकासाची ‘ब्लू प्रिन्ट’, 2. शस्त्र की शास्त्र..?, 3. ज्ञानतपस्वी: रघुनाथ माशेलकर, 4. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि तरूण पिढी. असे विषय आहेत.
स्पर्धेसाठी रू.50 इतके प्रवेशशुल्क आकारण्यात आले आहे, ते नावनोंदणीवेळी जमा करावे. दि.25 सप्टेंबरपर्यंत स्पर्धकाची नावनोंदणी होणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव प्रवेशशुल्क परत दिले जाणार नाही. स्पर्धेचा दिनांक, ठिकाण, वेळ नंतर कळविला जाईल. स्पर्धकाने स्वखर्चाने स्पर्धेला यायचे आहे. महाविद्यालयीन स्पर्धकाला बोलण्यासाठी 5+2 मिनिटे तर खुला गटासाठी 7+2 मिनिटे इतका वेळ देण्यात येईल. प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र, पुस्तकभेट देण्यात येईल. अधिक माहितीसाठी व प्रवेशशुल्क तसेच नाव नोंदणीसाठी ओंकार मुळे मो.नं.: 9420458878 याठिकाणी संपर्क साधावा, असे जनसेवा ग्रंथालयातर्फे कळविण्यात आले आहे.











