सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष श्री. रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
वेंगुर्ला: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ राबवित असलेल्या ‘भंडारी कुटुंब जनगणना’ कार्यक्रमासाठी नेमलेल्या एजन्सीला त्यांच्या कामाची मुदतवाढ देण्याचे एकमताने ठरविण्यात आले .तसेच 5 डिसेंबर रोजी मालवण येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेऊन समाजातील थोर व्यक्तींना तेथे मानाचे स्थान मिळण्यासाठी सर्व भंडारी समाज बांधवांनी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सिद्धिविनायक मंगल कार्यालय कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष श्री. रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस समाजातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली .त्यानंतर अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी वर्षभराच्या कार्याचा आढावा आपल्या मार्गदर्शनपर भाषणात घेतला. महासंघाने काढलेल्या कॅलेंडर 2023 च्या जमा खर्च , तसेच भंडारी चषक 2023 बाबत संपूर्ण वस्तुस्थिती विशद करण्यात आली .भंडारी महासंघाने हाती घेतलेल्या भंडारी कुटुंब जनगणना कार्यक्रमाची सुद्धा वस्तुस्थिती कथन करण्यात आली व यावर चर्चा करून नेमलेल्या एजन्सीला त्यांच्या कामाची मुदतवाढ देण्याचे निश्चित करण्यात आले .सभेत सर्व विषयांवर विस्तृत चर्चा करून येत्या वर्षभरात राबवायच्या विविध कार्यक्रमाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेस कार्याध्यक्ष हेमंत करंगुटकर ,उपाध्यक्ष सीताराम खडपकर ,सुनील नाईक , सरचिटणीस विकास वैद्य , खजिनदार लक्ष्मीकांत मुंडये , अखिल भारतीय भंडारी महासंघाचे सचिव प्रवीण आचरेकर ,अतुल बंगे , राजू गवंडी ,मामा माडये , शरद पावसकर ,मनोहर पालयेकर , विलास करंजेकर , भरत आवळे ,श्रीकांत वेंगुर्लेकर प्रियदर्शन कुडव ,प्रदीप मुणगेकर ,दीपक कोचरेकर , दिवाकर म्हावंळणकर ,चंद्रकांत रेवणकर ,रत्नाकर कोळंबकर , चंद्रकांत कोचरेकर ,मनोहर आचरेकर ,निलेश गोवेकर ,चंदन पांगे ,जगदीश पांगे ,शरद कांबळी ,एकनाथ पिंगुळकर आदिसह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते . रमण वायंगणकर यांनी सर्व सदस्य ,पदाधिकारी यांचे स्वागत केले व डॉ. खडपकर यांनी आभार मानले.









