देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष व सभापती यांच्या कर्तुत्वावरच प्रश्नचिन्ह
देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीत रस्त्यावर बसणाऱ्या मासळी विक्रेत्यांची सोय अन्य ठिकाणी करा अन्यथा पुढील आठ दिवसात आंदोलन उभारू असा इशारा देवगड जामसांडे नगरपंचायतीतील भाजपा चे गटनेते शरद ठूकरुल यांनी दिला आहे
देवगड जामसांडेच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना त्यांनी निवेदन देऊन हा इशारा दिला आहे यामध्ये ते म्हणतात की ,मी भारतीय जनता पार्टी देवगड जामसंडे नगरपंचायत गटनेता आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, मी व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका नगरपंचायतच्या मासिक सभेत स्वच्छता, पाणी व कचरा अशा अनुषंगिक गोष्टीवर नगरपंचायतच्या मासिक सभेमध्ये वारंवार सूचना व त्याची अंमलबाजावणी या संदर्भात प्रश्न उपस्थित करीत असतो.
दिलेल्या सुचनांची नगरपंचायत प्रशासनाकडून अंमलबजावणी करून घेण्याचे काम संबंधित सत्ताधारी नगराध्यक्ष व संबंधित सभापती यांचे असून त्यावर कोणतीही ठोस कारवाई योग्य मुदतीत होताना दिसून येत नाही
फक्त नियोजन हे तोंडी होते व कागदी घोडे नाचवले जातात. मागील महिन्यात चतुर्थीपूर्व नियोजन कागदावर चांगल्याप्रकारे केले होते. त्याचे नियोजन सभेमध्ये जाहीर केले होते परंतु त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या मासे विक्रेत्यांना योग्य जागा मिळवून दया या संदर्भात नियोजन झाले होते. या संदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
कालच देवगडमध्ये मासे विक्रेते व स्थाठिकाणी एका टेम्पोचे ब्रेक फेल होवून अपघात झाला सुदैवाने दुपारची वेळ असल्याने जिवितहानी झाली नाही.
या संदर्भात आपण योग्य ती कार्यवाही करावी. चर्तुथी नियोजनात रस्त्याच्या दुतर्फा बाजूची झाडी तसेच गवत कापणे हे काम आज महिना होऊनही पूर्ण झाले नाही. डास प्रतिबंधक औषधी धुर फवारणी याचे नियोजन मासिक समेत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते परंतु ते सुद्धा डासांच्या वाढत्या प्रादुभावाने तापाच्या साथीचा शहरामध्ये सर्व ठिकाणी फैलाव झाल्यावर सुरू झाले आहे असे चित्र दिसते, तसेच प्रत्येक वॉर्डला स्वच्छता कर्मचारी असून व याठिकाणी तो स्वच्छता करीत असतो.
परंतु, गेले दोन महिने कर्मचारी स्वच्छता करीत नाही व कर्मचारी दिसत नाही, तसेच जमा करण्यात आलेल्या ओल्या सुक्या कचऱ्याचे विघटन न झाल्यामुळे तो कचरा तसाच टाकल्या गेल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे व साथीच्या आजारांचा प्रसार होत आहे
वरील सर्व समस्यांवर आपण योग्य तो आठ दिवसात निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक नगरसेविकांना तीव्र आंदोलन करावे लागेल,












