आडेली खुटवळवाडी येथील नळपाणी योजनेचे सरपंच यशश्री कोंडस्कर यांच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ले : प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशन अंतर्गत आडेली खुटवळवाडी साठी मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच यशश्री कोंडस्कर यांच्या हस्ते व श्रीधर नाईक याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याबाबत या भागातील ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर , भाजपा तालुका चिटणीस समीर कुडाळकर ,माजी पं. स. सदस्य भाऊ गडेकर ,उपसरपंच परेश हळणकर , ग्रा.पं. सदस्य सुधीर धुरी ,माजी सदस्य सुनील गडेकर , तात्या कोंडसकर , अशोक गडेकर , सत्यवान कुडाळकर ,विनोद कुडाळकर ,समीर गडेकर , आत्माराम परब ,यशवंत परब , संदेश सुळवाडकर , सदानंद परुळेकर ,निलेश धुरी ,उमेश शेणई , जीजी गडेकर , सुनिता गडेकर ,कृष्णा राऊळ , संतोष वराडकर , हरी पेडणेकर ,आनंद राणे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जमीनदाते बाळा नाईक यांचे आभार व्यक्त करण्यात आले.